तळे राखणारा संक्षिप्त असा लेख - हंसराज कांबळे
तळे राखणारा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जरी आपल्या मधून कायेने गेले असतील तरी पण त्यांनी लिहिलेली लिखित पुस्तके आणी खंड आपणा सर्वाना योग्य मार्गदर्शक आणी दिशादर्शक अशी आहेतच. वैचारिक पुस्तकांबद्दल आणी स्वतः बद्दल ते काय म्हणतात ते पहा - माझ्या विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राह्मणाच्या घरी नाही इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण 20,000 पुस्तके मजजवळ आहेत कुणाबरोबर दाखवून द्यावीत. एवढे जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल. मी विद्येची पूजा 24 तास करतो *संदर्भ -* खंड. 18 भाग 3 पृष्ठ. क्रं. 403. पुढे ते म्हणतात - साधारणपणे पुस्तक वाचन व माझे काम या पलीकडे माझे मन दुसरे कशातही रमत नसल्यामुळे मी फारसा कोणत्याच कार्यक्रमात भाग घेत नाही *संदर्भ -* उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 197.पैरा - 3. उपरोक्त दोन्ही संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्येचे किती व्यासंगी होते. म्हणूनच त्यांना आपण धर्मशास्त्रवेत्ता, घटनेचे शिल्पकार विद्येचा महामेरू आणी ज्ञानाचे प्रतीक या नावाने उपाधी लावून सर्वजण संबोधतो. त्यांनी एकदा आपल्य...