शिक्षणाची कास आणि ध्यास हिच पीईएसची देणगी: अशोक येरेकर

शिक्षणाची कास आणि ध्यास हिच पीईएसची देणगी: अशोक येरेकर

औरंगाबाद - आपण कोण आहोत, आपल्यात काय सामर्थ्य आहे व आपल्यातील ऊर्जा ओळखता आली पाहिजे ते कळणे म्हणजे शिक्षण होय.

याच शिक्षणाची कास आणि ध्यास हीच आपल्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची देणगी होय.असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशोक येरेकर यांनी सोसायटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलतांना केले.
नुकताच ८ जुलै रोजी पी.ई.एस.एज्युकेशन सोसायटीचा ७८ वा वर्धापन दिन सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान, प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, प्राचार्य डॉ.विनायक खिल्लारे, प्राचार्य डॉ.शिवाजी सूर्यवंशी व डॉ.अच्युतराव मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून पुढें बोलतांना येरेकर "शिक्षणास नैतिकतेचे महत्व आपण ओळखले पाहिजे. 

मिलिंद विद्यार्थी व नागसेन शिक्षक म्हणून आपले योगदान काय ? पालक म्हणून आपण आपल्या बहिणीसाठी व मुलींसाठी वर संशोधन करतांना किती काळजी घेते. त्याचप्रमाणे देशाचे भवितव्य ठरवतांना मतदार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक म्हणून किती जागरूक आहोत याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आपल्या उत्पन्नाचा 20 वा भाग समाजउपयोगी कार्यासाठी खर्च करतो काय?असा प्रश्न उपस्थित करत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेतील विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अरविंद गायकवाड संचालक,शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबाद यांनी मार्गदर्शन करतांना "पी.ई.एस.ही ज्ञानभुमी व उर्जाभुमी आहे. 

गुणवत्ता,सामाजिक जाणीव व लोकशाही मूल्यांची वाहक असलेली भूमी आम्हाला चिंतन करण्यास भाग पाडते.उपस्थितांनी जग बदलण्याच्या भानगडीत पडू नये स्वतःला बदला,जग आपोआप बदलेल असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी नागसेनवनातील विविध शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठ्यासंखेने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.एन.एम.करडे,तर सूत्रसंचालन डॉ.नवनाथ गोरे व आभार डॉ.गोविंद आढे यांनी व्यक्त केले. वर्धापनदिन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी करण्यात आली.

Popular posts from this blog

ग्रुप मध्ये राहण्यासाठी काही नियम व अटी

अण्णा भाऊ साठे यांचे भाषण :  समकाळाच्या पार्श्वभूमीवर आकलन